उज्जैनमधील भाऊ-बहिणीने एकाच वेळी मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाची राज्य सेवा परीक्षा 2021 उत्तीर्ण होऊन डेप्युटी कलेक्टर बनण्याचा मान मिळविला आहे. दोघे भाऊ-बहीण एकाच वेळी डेप्युटी कलेक्टर बनल्याने त्यांच्या कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आयोगाने नुकताच राज्य सेवा परीक्षेचा निकाल जाहीर केला. यात उज्जैन येथील अर्जुन सिंह ठाकूर आणि राजनंदनी सिंह ठाकूर उत्तीर्ण झाले आहेत. अर्जुनसिंह 21 व्या तर राजनंदनी यांना 14 वी रँक मिळाली आहे. या दोघांनी भोपाळ येथून इंजिनीयरिंगची पदवी मिळविली असून त्यांचे वडील डॉ. वाय.एस. ठाकूर इंजिनीयरिंगचे प्राध्यापक आहेत. राजनंदनी यांची 2020 मध्ये नायब तहसीलदार पदी वर्णी लागली होती. तर अर्जुन सिंह यांना टीसीएसमध्ये नोकरी मिळाली होती.