बहिणीच्या प्रेमप्रकरणाने भावाचा संताप, गुप्तांगात गोळ्या झाडून हत्या

2842

बहिणीच्या प्रेमप्रकरणाने संतापलेल्या भावाने अत्यंत निर्घृणपणे तिची हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेश येथील मेरठमध्ये घडली आहे. तिच्या हत्येप्रकरणी तिचा भाऊ, आई-वडील यांच्यासह दोन जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपी हा पीडितेचा सख्खा चुलत भाऊ असल्याची माहिती मिळत आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, टीना चौधरी असं या पीडितेचं नाव आहे. रविवारी तिला तिच्या कुटुंबीयांनी गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं होतं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिला मृत घोषित करण्यात आलं आणि पोलिसांना याची सूचना देण्यात आली. पोलिसांसमोर तिच्या कुटुंबीयांनी काही सशस्त्र दरोडेखोर घरात शिरले आणि त्यांनी तिच्यावर हल्ला केल्याचा कांगावा केला. मात्र, तिच्या शवविच्छेदन अहवालात तिच्या जांघेत, गुप्तांगात आणि कमरेच्या वर तीन गोळ्या लागल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे पोलिसांना कुटुंबातच काळंबेरं असल्याचा संशय आला.

दरम्यान, काही पोलिसांनी तिच्या घराची तपासणी केली. त्या तपासणीत घरात रक्ताचं थारोळं झालेलं त्यांना आढळलं. ते पुसायचा प्रयत्न केल्याचं तसेच त्याच्या बाजूला काचेच्या बांगड्यांचे तुकडे पडल्याचंही त्यांना आढळले. त्यामुळे त्यांचा संशय बळावला. त्यामुळे पोलिसांनी तिच्या कुटुंबाची कसून चौकशी केली, तेव्हा त्यांनी आपला गुन्हा कबूल केला.

टीना हिचे तिच्याच गावात राहणाऱ्या एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. मात्र, तिच्या घरच्यांना ते मान्य नव्हतं. त्यावरून तिचे आणि तिच्या कुटुंबीयांचे वादही होत असत. रविवारी तिच्या घरी तिचे काका आणि तिचा चुलतभाऊ आले होते. तिचा चुलतभाऊ प्रशांत याला तिच्या प्रेमप्रकरणाविषयी कळलं. त्याने तिला प्रियकराशी असलेले संबंध संपवण्याबाबत सांगितलं. पण, टीनाने प्रियकराशी लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली. यानंतर त्या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. भांडणाच्या भरात संतापलेल्या प्रशांतने तिच्या गुप्तांगात गोळ्या झाडल्या. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या