वैदिक पद्धतीने लग्न केल्याचा राग, भावाने केला बहिणीचा खून

83

सामना ऑनलाईन । नाशिक

वैदिक पद्धतीने लग्न केल्याचा राग मनात धरून सख्ख्या भावाने आपल्या बहिणीचा गळा आवळून खून केला. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील दहिवड येथे ही धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवळा तालुक्यातील दहिवड येथील एका तरुणीने आपल्याच नात्यात लग्न केले होते. तरुणीने आत्याच्या मुलीशी लग्न केले होते. परंतु तिच्या भावाला हे संबंध पसंत नव्हते, तसेच बहिणीने वैदिक पद्धतीने लग्न केल्याचा रागही त्याच्या मनात कायम होता. अखेर या रागातून भावाने घरी कोणीही नसताना बहिणीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर बहिणीने आत्महत्ये केल्याचा बनाव केला, परंतु शवविच्छेदनाच्या अहवालानंतर तरुणीचा खून केल्याचे उघड झाल्यानंतर आणि पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर भावाने खून केल्याचे उघड झाले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या