10 हजारांहून कमी किंमतीत मिळताहेत ‘हे’ 5 दमदार स्मार्टफोन, फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

जगातील फोन निर्मात्या कंपन्यांना हिंदुस्थानचे स्मार्टफोन मार्केट आकर्षीत करत असते. हजारो कोटींचे मार्केट असणाऱ्या हिंदुस्थानमध्ये दररोज नवनवीन स्मार्टफोन लॉन्च होत असतात. तुम्हीही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट 10 हजारांपर्यंत असेल तर आम्ही तुम्हाला 5 बजेट स्मार्टफोनबाबत माहिती देणार आहोत. तसेच या स्मार्टफोनची किंमत आणि त्यामध्ये काय वैशिष्ट्य आहेत हे देखील सांगणार आहोत.

Realme Narzo 30A

realme-narzo-30a

Realme कंपनीने अल्पावधीमध्ये ग्राहकांच्या मनावर कब्जा केला आहे. या कंपनीचाRealme Narzo 30A हा एक बजेट फोन आहे. यात 6.5 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला असून 10 हजारांहून कमी किंमतीत 3 जीबी रॅम व 4 जीबी रॅमचा पर्याय उपलब्ध आहे. यात 6000 एमएएचची दमदार बॅटरीही मिळत आहे. फोटो आणि व्हिडीओसाठी 13 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा यात देण्यात आलेला आहे. फ्लिपकार्टवर या फोनची सुरुवातीची किंमत 7 हजार 999 रुपये एवढी आहे.

Moto G10 Power

moto-g10-power

अँड्रॉईड स्टॉक व्हर्जनवर काम करणाऱ्या Moto G10 Power या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच यात स्नॅपड्रॅगन 460 प्रोसेसर देण्यात आले आहे. 10 हजारांहून कमी किंमत असणाऱ्या फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फ्लिपकार्टवर याची सुरुवातीची किंमत 8 हजार 999 रुपये आहे.

Redmi 9 Prime

redmi-9-prime

चीनची फोन निर्माता कंपनी रेडमीचा Redmi 9 Prime या स्मार्टफोनमध्ये क्वाड रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फीसाठी यात 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असून 5020 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच 6.5 इंचाचा डिस्प्ले यात असून मीडियाटेक हीलियो जी80 प्रोसेसरही देण्यात आला आहे. फ्लिपकार्टवर याची किंमत 9 हजार 499 रुपये आहे.

Realme C25

realme-c25

रिअलमीचा Realme C25 हा आणखी एक बजेट स्मार्टफोन आहे. यात 6000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच 6.5 इंचाचा डिस्प्लेही आहे. फोटो आणि व्हिडीओसाठी यात 13 मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा आणि सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फ्लिपकार्टवर याची किंमत 9 हजार 499 रुपये आहे.

Redmi 9 Power

redmi-9-power

बजेट कमी असेल तर Redmi 9 Power हा स्मार्टफोनही चांगला पर्याय आहे. यात 6.53 इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला असून 6000 एमएएचची बॅटरी आहे. फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. क्वालकॉम स्नैपड्रैगन 662 प्रोसेसर यात देण्यात आला आहे. फ्लिपकार्टवर या फोनची किंमत 9 हजार 999 रुपये आहे.

आपली प्रतिक्रिया द्या