नालासोपाऱ्यात इमारत कलंडली, रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले, दैव बलवत्तर म्हणून दुर्घटना टळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नालासोपारा पूर्वेत चार मजली जुनी इमारत शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास एका बाजूला अचानक कलंडल्याची धक्कादायक घटना घडली. त्यामुळे इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. याबाबत माहिती मिळताच वसई-विरार महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत सर्व रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. केवळ दैव बलवत्तर होते म्हणून मोठी दुर्घटना टळल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला .

नालासोपारा पूर्व ओमनगर परिसरात दुर्गेश्वरी अपार्टमेंट नावाची चार मजली इमारत आहे. ही इमारत आज सायंकाळी अचानक कलंडली. त्यामुळे सगळ्यांचीच घाबरगुंडी उडाली. काहीजणांनी घराबाहेर पळत सर्वांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर काहीवेळातच दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य हाती घेतले. वृद्ध, लहान मुलांना उचलून सुरक्षितस्थळी आणण्यात आले. या सर्व रहिवाशांना जवळच्या शाळेत राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.