बुलढाण्यात बारावीचा निकाल 92.18 टक्के; मुलींचाच बोलबाला

542

राज्यात बारावीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. बुलढाणा जिल्ह्यात मुलींनी बाजी मारली असून सर्व शाखांमध्ये मुलींचाच बोलबाला आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल 92.18 टक्के लागला आहे. जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेला जिल्ह्यातून एकूण 32 हजार 552 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी 32 हजार 440 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी 29 हजार 903 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी 18 हजार 514 मुले, तर 13 हजार 926 मुली आहेत. त्यापैकी 16 हजार 694 मुले आणि 13 हजार 209 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. यामध्ये मुलांची टक्केवारी 90.17 असून मुलींची टक्केवारी 94.85 आहे.

शाखानिहाय निकालामध्ये विज्ञान शाखेस जिल्ह्यातील 14510 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी 14119 परीक्षेस बसले असून 13 हजार 862 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्यांची टक्केवारी 98.18 आहे. तसेच कला शाखेत 12712 विद्यार्थ्यांनी नोंदणी होती. त्यापैकी 12651 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या शाखेत 11 हजार 456 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून टक्केवारी 90.55 आहे. वाणिज्य शाखेमध्ये 3316 विद्यार्थी नोंदणी व 3309 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. त्यापैकी 3092 उत्तीर्ण झाले असून 93.44 निकालाची टक्केवारी आहे. व्होकेशनल शाखेत विद्यार्थी नोंदणी 1099 आहे, तर 1088 विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यापैकी 957 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याची टक्केवारी 87.96 आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात 1273 विद्यार्थ्यांनी पुर्नपरीक्षा दिली. त्यापैकी 536 उत्तीर्ण झाले आहेत. त्याची टक्केवारी 42.11 आहे.

जिल्ह्यात नियमित विद्यार्थ्यांमध्ये 17 हजार 548 मुलांनी परीक्षेस नोंदणी केली. तसेच 13 हजार 729 मुलींनी नोंदणी केली. यामध्ये 17 हजार 505 मुले व 13 हजार 662 मुली परीक्षेस बसले. तर 16 हजार 287 मुले व 13 हजार 80 मुली उत्तीर्ण झाल्या. त्याचप्रमाणे पुर्नपरीक्षार्थ्यांनी व्होकेशनल शाखेत उत्तीर्णतेचा अधिक टक्का दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या