
महाड शहरातील काजळपुरा परिसरात एक पाच मजली निवासी इमारत पत्त्यासारखी कोसळली आहे. सोमवारी संध्याकाळी 7 वजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. तारीक गार्डन असे इमारतीचे नाव आहे. या दुर्घटनेतील मृतांची नेमकी संख्या समजलेली नाही. मात्र, निवासी इमारत असल्याचे मृतांची संख्या जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या इमारतीत 47 फ्लॅट असून त्यात 40 कटुंब राहत होती. त्यामुळे ढिगाऱ्याखाली 70-80 लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
आतापर्यंत ढिगाऱ्याखालून 15 लोकांना जखमी अवस्थेत बाहेर काढले असून त्यांना उपचारासाठी महाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इमारतीत 40 कुटुंब रहात होती. काही तासांपूर्वी इमारत हलत असल्याचे लक्षात आल्याने काही कुटुंब घराबाहेर पडले होते. सुमारे 25 कुटुंब घराबाहेर पडले होते. पण 15 कुटुंबे ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एनडीआरएफची तीन पथके पुण्याहून महाडकडे रवाना झाली आहेत. ही इमारत पाच वर्षांपूर्वी बांधलेली आहे. युनुस शेख व पटेल इमारतीचे ठेकेदार होते.



























































