पेट्रोल परवडत नसल्याने बुलेट जाळून टाकली ?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवेंद्र वालावलकर, म्हापसा

देशात सर्वात कमी इंधनाचे दर असतील तर ते बहुधा गोव्यामध्येच असतील. केंद्र सरकारने गुरुवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात अडीच रुपयांची कपात केल्यानंतर शुक्रवारी इथले पेट्रोलचे दर 74.90 रुपये इतके होते.  गोवा राज्य सरकारने  अडीज रुपयांची कपात अजून केलेली नाहीये. ती झाल्यानंतर गोव्यातही इंधन 5 रुपयांनी स्वस्त होईल.  तरीही हे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहेत.

गोव्यातील म्हापसा भागात एका अज्ञात तरुणाने दीड लाख रूपये किमतीची बुलेट जाळून टाकली. या बुलेटची नंबर प्लेट नसल्याने ती कोणाची आहे हे कळू शकलं नाही. हा प्रकार रात्री 8 वाजता न्यायालयाबाहेर घडला आहे. एक माणूस डिओ बाईकवरून येतो आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या बुलेटवर पेट्रोल ओतून आग लावून टाकतो असा व्हिडीओ गोव्यात व्हायरल झालाय. या माणसाने पेट्रोल परवडत नसल्याने ही आग लावली नाही ना असा प्रश्न विचारला जातोय