घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना अटक; पाच लाखांचा ऐवज जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील मध्यवर्ती डेक्कन परिसरात घरफोडी करणाऱ्या दोन चोरट्यांना युनीट तीनने अटक केली. त्यांच्याकडून 5 लाख 13 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सुहास चंद्रकांत दिघे (वय 30, रा. एरंडवणा), अनिल बाबु बावधने (वय 23, रा. वारजे जकातनाका, कर्वेनगर ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

डेक्कन परिसरात घरफोडी करणारे कर्वेनगरमध्ये येणार असल्याची माहिती पोलीस अमलदार राजेंद्र मारणे यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सुहास दिघे आणि अनिल बावधने यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी घरफोडी केल्याची कबुली दिली. ही कामगिरी उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे, उपनिरीक्षक गुंगा जगताप, उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे, रामदास गोणते, सोनम नेवसे, ज्ञानेश्वर चित्ते, सतिश कत्राळे, राकेश टेकावडे, गणेश शिंदे, साईनाथ पाटील, भाग्यश्री वाघमारे यांनी केली आहे.