लखीमपूरमध्ये बस अपघात; आठ ठार 

उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये बुधवारी भरधाव जाणारा ट्रक आणि खासगी बसची जोरदार धडक झाली.  ऐरा पुलावर झालेल्या या धडकेत बसचा चक्काचूर झाला. त्यावेळी बसमध्ये चालकासह सुमारे 65 प्रवासी होते. यातील आठ जणांचा जागीच मृत्यू झाला असून 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना लखनौला पाठवण्यात आले असून उर्वरित प्रवाशांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी झालेल्यांपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.