भायखळा, डोंगरीतील बेकायदा बांधकामांवर पडणार हातोडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डोंगरीतील केसरबाई दुर्घटनेत 13 जणांचा बळी गेल्यामुळे भायखळा, डोंगरीतील बेकायदा बांधकामांवर धडक कारवाई करण्यासाठी पालिकेने ‘ऍक्शन प्लॅन’ तयार केला आहे. डोंगरीतील काही बेकायदा इमारतींवर पालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली असून ही बांधकामे लवकरच जमीनदोस्त केली जाणार आहेत. बी आणि सी वॉर्डमधील सर्व बेकायदा बांधकामांवर कारवाई केली जाणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

डोंगरीतील केसरबाई इमारत दुर्घटनेनंतर मुंबईतील अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला. पालिकेने यानंतर मुंबईतील अनधिकृत बांधकामांचे सर्केक्षण केले. कुर्ला, भायखळा, डोंगरी, नागपाडा, साकीनाका, वडाळा, धारावी या भागांत मोठय़ा प्रमाणाकर अनधिकृत बांधकामे असल्याचे निदर्शनास आले. पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रथमच बी आणि सी विभागातील अनधिकृत बांधकामांची यादी तयार केली आहे. त्यानुसार छोटय़ा आणि मोठय़ा प्रमाणात झालेल्या अनधिकृत बांधकामांकर कारवाईला सुरुवात झाली आहे.

म्हणूनच कारवाईला वेग
यापूर्वी अनधिकृत बांधकामप्रकरणी पालिकेकडून 354 अन्वये नोटीस बजावली जात होती, मात्र संबंधित इमारत मालक न्यायालयात धाव घेऊन कारकाईवर स्थगिती मिळवत असत. त्यामुळे कारवाईला अडचणी येत होत्या. पालिकेने याप्रकरणी न्यायालयात दाद मागितली. अतिधोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य करणाऱया रहिवाशांच्या सुरक्षितेसाठी संबंधित इमारती पाडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली. न्यायालयानेही याप्रकरणी हिरवा कंदील दाखवल्यामुळे बी आणि सी वॉर्डमधील अनधिकृत बांधकामांची यादी तयार करण्यात आली असून कारवाई सुरू करण्यात आली आहे.