‘सीएए’ची सुरुवात उत्तर प्रदेशपासून, शरणार्थींची माहिती घेण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात नागरिकता सुधारणा कायद्याची (सीएए) अंमलबजावणी प्रथम उत्तर प्रदेशमध्ये केली जाणार असून त्यानुसार, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून आलेल्या हिंदू, शीख, ख्रिश्चन, जैन, पारशी आणि बौद्ध शरणार्थींची माहिती गोळा करण्याचे आदेश उत्तर प्रदेश सरकारने अधिकाऱ्यांना दिले आहेत.

शरणार्थींची माहिती गोळा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सीएए लागू करण्याच्या दिशेने टाकलेले हे उत्तर प्रदेश सरकारचे पहिले पाऊल आहे, अशी माहिती राज्याच्या गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अविनाश अवस्थी यांनी दिली. अफगाणिस्तानमधून आलेल्या शरणार्थींची संख्या कमी आहे तर पाकिस्तान, बांगलादेशमधून आलेल्या शरणार्थींची संख्या मोठी असून ते लखनौ, हापूड, रामपूर, शाहजहानपूर, नोएडा आणि गाजियाबाद या शहरांमध्ये ते राहत आहेत, असे अवस्थी म्हणाले.

उत्तर प्रदेशमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशमधून आलेल्या शरणार्थींची संख्या मोठी असून राज्य सरकारने तयार केलेल्या यादीच्या आधारावर नागरिकता सुधारणा कायद्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे गृह विभागाने सांगितले.