Video – सीएए, एनआरसीचा वाद क्रिकेटच्या मैदानात, दोन्ही बाजूने तुफान घोषणाबाजी

667

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि नागरिकत्व नोंदणी कायदा (एनआरसी) याचा वाद आता क्रिकेटच्या मैदानावर पोहोचला आहे. वानखेडेवर झालेल्या पहिल्या वन डे दरम्यान या कायद्याला विरोध करणाऱ्या आणि याचे समर्थन करणाऱ्यांची जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली.

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियातील पहिला एक दिवसीय सामना मुंबईतील वानखेडे मैदानात रंगला. यावेळी विद्यार्थ्यांचा एक गट ‘नो सीएए’, ‘नो एनआरसी’, ‘नो एपीआर’ असे शब्द रेखाटलेले पांढरे शर्ट घालून मैदानात आला. ‘मुंबई अगेन्स्ट सीएए’ या समूहाशी संलग्न हे विद्यार्थी होते. विजय मर्चंट पवेलियनमध्ये हे विद्यार्थी बसले होते.

मैदानात सीएए, एनआरसीला विरोध होताना पाहन दुसऱ्या गटाने मोदी…. मोदी…. मोदीची घोषणाबाजी सुरु केली. यावेळी सुरक्षा रक्षकांनीही या विद्यार्थ्यांजवळ जाऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. यावेळी सीएए आणि एनआरसीचे समर्थन करणाऱ्या गटाकडून आणि विरोध करणाऱ्या गटाकडून घोषणाबाजी सुरु झाल्याने मैदानात गोंधळ उडाला. परंतु हिंदुस्थानचा डाव संपण्यापूर्वी विरोध करणाऱ्या गटाचे विद्यार्थी बाहेर निघून गेले.

पाहा नक्की काय झालं?

आपली प्रतिक्रिया द्या