मंत्रिमंडळ निर्णय, एमआयडीसीच्या कर्ज उभारणीच्या अधिकारात वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एमआयडीसीच्या कर्ज उभारणीच्या अधिकारात वाढ करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, 1961 मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. पुरंदर विमानतळ जमीन संपादनासाठी हुडकोकडून 6 हजार कोटींचे कर्ज घेण्यास शासनाने मान्यता व शासनहमी दिली आहे. सध्या पुरंदर विमानतळाकरिता जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. तसेच राज्यात विविध औद्योगिक क्षेत्रे, विशेष आर्थिक क्षेत्रे व आवश्यक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठय़ा प्रमाणात जमीन संपादन सुरू आहे. यात शेतकऱ्यांना योग्य भरपाई देण्यासाठी तसेच नवीन औद्योगिक प्रकल्प व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आवश्यक अतिरिक्त आर्थिक संसाधनांची गरज लक्षात घेता या निर्णयास मान्यता देण्यात आली.

नवीन महाविद्यालय मंजुरीसाठी 30 जूनची मुदत

राज्यातील नवीन महाविद्यालयांना अंतिम मान्यता, विस्तारीकरणात नवीन विद्याशाखा, अभ्यासक्रम व नवीन विषय, तुकडी आदी विषयांना अनुसरून शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम 2016 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. या निर्णयानुसार नवीन महाविद्यालय चालू करण्यास परवानगी देण्यास 30 जून
2026 ची मुदत राहणार आहे.

वस्तू व सेवा कर अधिनियम सुधारणा

वस्तू व सेवा कर परिषदेच्या 56व्या बैठकीमध्ये भारत सरकारने पेंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियम, 2017 च्या विविध कलमांमध्ये सुधारणा केलेल्या आहेत. या तरतुदींशी सुसंगत आणि सुसूत्रतेसाठी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम 2017 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली.