ब्रह्मपुरीत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने केबल ऑपरेटर गंभीर जखमी

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथील नगरपरिषदेच्या इमारतीवार चढून टीव्ही प्रक्षेपणच्या केबलची दुरुस्ती करताना मोठ्या लानईच्या विजेच्या तारेला हात लागल्याने केबल ऑपरेटर संजय रणदिवे (52) पेठवार्ड ब्रम्हपुरी हे जखमी झाल्याची घटना घडली. शहरात केबलचे व इंटरनेटचे केबल लावले आहेत. बाजार चौक स्थित नगरपरिषदेवर असलेल्या केबलचे काम करण्यासाठी संजय रणदिवे चढले होते.

काम करता करता अचानक जवळून गेलेल्या मोठ्या विजप्रवाहाच्या तारांना स्पर्श झाल्याने हाताला दुखापत होऊन पेट घेतल्याने ते जखमी झाले आहेत. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत त्यांना उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहे.