पालिकेच्या खर्चाची ‘कॅग’कडून चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना लढय़ादरम्यानच्या काळात पालिकेने कोविड रोखण्यासाठी आणि नागरी सुविधांसाठी केलेल्या सुमारे 12 हजार कोटींच्या खर्चाची तपासणी आजपासून ‘कॅग’कडून (महालेखा परीक्षक) सुरू करण्यात आली आहे. यासाठी दिल्लीतून पालिका मुख्यालयात आठ ते दहा अधिकाऱयांची टीम दाखल झाली. 16 डिसेंबरपर्यंत ही तपासणी केली जाणार असून त्यानंतर तपासणी अहवाल दिला जाणार आहे.

मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोनाने शिरकाव केला. त्याला रोखण्याचे काम करतानाच पालिकेने नागरी सुविधा उभारण्याचे कामही सुरू ठेवले. या दोन ते अडीच वर्षांत पालिकेला सुमारे 12 हजार कोटींचा खर्च करावा लागला होता.