हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास होतो…’या’पदार्थांचा करा आहारात समावेश…

हिवाळ्यात साथीच्या रोगांचा फैलाव झपाट्याने होतो. तसेच या ऋतूत अनेक जुने आजारही डोके वर काढतात. संधीवाताची समस्या असलेल्यांना किंवा वृद्धांना थंडी वाढली की सांधेदुखीचा त्रास सुरू होतो. सांधेदुखीमुळे त्यांना चालताही येत नाही. सांधेदुखी असल्यास तिळाच्या तेलाने मालीश करण्यासह आहारात काही बदल केल्यास सांधेदुखीपासून आराम मिळतो.

हिवाळ्यात साथीचे रोग फैलावण्याची शक्यता असल्याने हळद दूध घेण्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच हळद दूध सांधेदुखीसाठीही रामबाण इलाज आहे. हळदीत असणाऱ्या अॅण्टी इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे सांधेदुखीपासून आराम मिळतो. तसचे दुधात कॅल्शियम असल्याने हाडे बळकट होतात. त्यामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो. हळद दूधात केसर टाकल्याने त्याचा स्वादही वाढतो.

हिवाळ्यात अनेकजण आवर्जून डिंकाच्या लाडूचे सेवन करतात. डिंकाचे लाडू शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून अशक्तपणा मरगळ दूर करण्यास फायदेशीर आहे. तसेच सांधेदुखी असलेल्यांनाही डिंकाच्या लाडूचा फायदा होतो. डिंकाच्या लाडूमध्ये वापरण्यात येणाऱ्या सुक्या मेव्यामुळे शरीराला आवश्यक ती उष्णता मिळते आणि हाडेही मजबूत होतात. त्यामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो.

अनेकजण दिवसाची सुरुवात हेल्थ ड्रिंक्सने करतात. अनेकजण लिंबूपाणी आणि मध घेतात. तसेच संत्रे,गाजर यांचा ज्यूसही सांधेदुखीचा त्रास असलेल्यांसाठी उपयोगी आहे. संत्रे, गाजर ज्यूसमध्ये आले टाकल्यास त्याचे औषधी गुणधर्म आणखी वाढतात. या पदार्थांमध्ये असलेल्या  अॅण्टी इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे ते शरीराला बळकटी आणि उर्जा देतात. तसेच त्यांच्याक कॅल्शियमही असल्याने हाडांची शक्ती वाढून सांधेदुखीचा त्रास कमी होतो.

पेरू, पनीर,गुळ आणि चिंच यांच्या मिश्रणाचे सलाद रुचकर लागते. आहाराचा स्वाद वाढवण्याबरोबरच ते आरोग्यालाही फायदेशीर आहे. पेरू आणि पनीरमध्ये असलेले कॅल्शियम सांधुदुखीचा त्रास कमी करण्यास मदत करते. तसेच या सलादमध्ये आणखी काही पौष्टिक आणि आरोग्याला फायदेशीर असणाऱ्या पदार्थांचाही समावेश करता येऊ शकतो.

हिवाळ्यात अनेकजण सूप घेतात. हिवाळ्यात ब्रोकली आणि बदामाचे सूप घेतल्याने आरोग्यालाही फायदा होतो. या सूपमुळे शरीराला कॅल्शियम, ओमेगा 3 फॅटी अॅसिड विपुल प्रमाणात असतात. ते हाडांसाठी टॉनिकचे काम करतात. त्यामुळे हाडांना उर्जा मिळते. त्यामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो. त्यामुळे औषधोपचार, मालिश आणि आहारात काही बदल केल्यास हिवाळ्यात सांधेदुखीपासून सुटका होऊ शकते.

आपली प्रतिक्रिया द्या