
तृणमूल कॉँग्रेसचे नेते मुकुल रॉय यांचे विधानसभा सदस्यत्व कोलकाता उच्च न्यायालयाने रद्द केले. पक्षांतरविरोधी कायद्यानुसार दाखल केलेल्या याचिकेवर हा निर्णय दिला.
मुकुल रॉय यांनी 2017ला भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर मे 2021मध्ये झालेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर जिंकले. मात्र महिनाभरातच ते व त्यांचा मुलगा सुभ्रांशू हे तृणमूलमध्ये परतले. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली होती. ती अध्यक्षांनी फेटाळली. त्यानंतर अधिकारी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.



























































