
अडीअडचणीच्या काळात पीपीएफ अकाऊंटवर कर्ज काढता येते. ते पर्सनल लोनपेक्षा खूप स्वस्त पडते. सीबिल स्कोअर चेक न करता कर्ज मिळते.
बँक ते देण्यास नकार देऊ शकत नाही. पीपीएफ ही सर्वात सुरक्षित गुंतवणुकाRपैकी एक आहे, गुंतवणूक, व्याज आणि मॅच्युअर्ड रक्कम करमुक्त असते.
अकाऊंट उघडल्याच्या पहिल्या वर्षापासून ते पाच वर्षांपर्यंतचा कालावधी असतो. पाच वर्षांनंतर, कर्ज उपलब्ध नसते; त्यानंतर फक्त अंशतः पैसे काढता येतात.
कर्जाची रक्कम तुमच्या पीपीएफ
बॅलेन्सवर अवलंबून असते आणि वर्षातून फक्त एकदाच घेता येते. लोन फेडण्याचा कालावधी जास्तीत जास्त 36 महिने आहे.
पीपीएफची खास गोष्ट म्हणजे 15 वर्षांनंतर अकाऊंटला 5-5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये वाढवले जाऊ शकते. मॅच्युरिटीनंतरही
बॅलेन्सवर व्याज मिळत राहाते.


























































