कॅप्टन दीपक साठे यांचे पार्थिव मुंबईत, मंगळवारी अंत्यसंस्कार

1475
अपघातात मृत्यूमुखी पडलेले वैमानिक दीपक साठे

केरळच्या कोझिकोडे आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या दुर्घटनेत शेकडो प्रवाशांचे प्राण वाचवणारे कॅप्टन दीपक साठे यांचे पार्थिव आज विशेष विमानाने मुंबईत आणण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 येथे हे पार्थिव अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात आले होते. यावेळी एअर इंडियाचे वैमानिक तसेच अन्य कर्मचाऱयांनी कॅप्टन साठे यांना श्रद्धांजली वाहिली. दीपक साठे यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर श्रद्धांजली वाहिल्यानंतर त्यांचे पार्थिव भाभा रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या मृत्युमुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. सध्या आम्हाला एकांतात राहू द्या, अशी विनंती त्यांच्या कुटुंबीयांनी प्रसिद्धीमाध्यमांना केली असून त्यांची दोन्ही मुले सोमवारी रात्री अमेरिकेहून परतणार आहेत. त्यानंतर मंगळवारी कॅप्टन दीपक साठे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या