शाकाहाराने खेळात सुधारणा झाली! खवय्या कोहलीची कबुली

21

सामना ऑनलाईन । राजकोट

क्रिकेटच्या मैदानात खोऱयाने धाव काढणारा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आपल्या फिटनेसप्रमाणे आहाराच्या बाबतीतही अतिशय दक्ष आहे. आपला फिटनेस सुधारून खेळ दर्जेदार व्हावा यासाठी त्याने चक्क आपल्या खवय्येगिरीवर पाणी सोडले आहे. एके काळी अंडी -चिकन आणि मटण बिर्याणीवर खरपूस ताव मारणारा विराट आता शाकाहारी भोजनाचा पुरस्कर्ता बनला आहे. फिटनेससाठी त्याने पूर्ण शाकाहारी बनण्याचा निर्णय घेतला आहे. शाकाहाराने आपल्या खेळात सुधारणा झाल्याची कबुली त्याने दिली.

विराट कोहलीने चार महिन्यांपासून नॉनव्हेज खाल्ले नाही आणि असे केल्यानेच खेळात सुधारणा झालीय असे त्याला वाटतेय. सध्या प्रोटीन शेक आणि पालेभाज्या हा त्याचा आहार आहे. त्याने अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ खाणेही सोडून दिलेय. शाकाहारामुळे पचनशक्ती वाढलीय. त्यामुळे पहिल्यापेक्षा अधिक तंदुरुस्त वाटतेय, असे कोहलीचे म्हणणे आहे.

अनेक स्टार क्रीडापटूंनी सोडलाय मांसाहार

शरीराची पचनशक्ती वाढावी यासाठी फुटबॉल सुपरस्टार लिओनेल मेस्सी याने फुटबॉल विश्वचषकाच्या काळात मांसाहार पूर्ण सोडला होता. याशिवाय टेनिस तारका सेरेना आणि व्हीनस विल्यम्स भगिनी, फॉर्म्युला-वन चॅम्पियन लुईस हॅमिल्टन यांनीही मांसाहार पूर्ण वर्ज्य करून शाकाहाराचा स्वीकार केला आहे.

summary: Captain Kohli turns vegan, feels it has improved his game

आपली प्रतिक्रिया द्या