देवदर्शनावरून परतताना मोटार उलटली; तरुणाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मित्रांसह देवदर्शन करून घरी परतताना मोटार उलटून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला, तर मोटारीतील अन्य चौघे जखमी झाले आहेत. आजरा तालुक्यातील उत्तुर परिसरात आज पहाटे हा अपघात झाला.

रोहित रमाकांत कुडाळकर (वय 25, रा. कुंभारवाडी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. चालक ओंकार मेघनाथ वालावलकर (वय 24, लक्ष्मीवाडी, ता. कुडाळ), जगन्नाथ सूर्यकांत पेडणेकर (वय 30, रा. कुडाळेश्वर), रघुनाथ बाबू कुंभार (वय 30, रा. कुंभारवाडी, ता. कुडाळ) आणि बाबूराव सुभाष परब (वय 29, रा. नाबारवाडी, ता. कुडाळ) अशी जखमींची नावे आहेत.

कुडाळ येथील काही मित्र एकवीरादेवीच्या दर्शनासाठी मोटारीने गेले होते. देवदर्शनानंतर सर्वजण महाबळेश्वर, कोल्हापूर, आजरामार्गे कुडाळकडे निघाले होते. पहाटे उत्तुरनजीक स्मशानभूमीजवळ आले असता त्यांची कार उलटली.