कार, दुचाकीच्या अपघातात दोन ठार

519
accident

सटाणा तालुक्यातील आसखेडा ते द्याने फाटा रस्त्यावर बुधवारी दुपारी इंडिगो कारच्या धडकेत दुचाकीवरील दोन तरूणांचा मृत्यू झाला.

सटाणा तालुक्यातील मोराणे येथील गौरव भगवान कांदळकर (30) हे एका तरूणासमवेत दुपारी दोनच्या सुमारास दुचाकीवरून नामपूर येथून आसखेड्याच्या दिशेने निघाले होते. ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कांदळकर यांची दुचाकी समोरून येणाऱ्या इंडिगो कारवर आदळली. या भीषण अपघातात कांदळकरांसह मागे बसलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. इंडिगो चालक जालिंदर रवींद्र जाधव याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती जायखेडा पोलिसांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या