
दिवसाढवळ्या कार डिलरची हत्या झाल्याची घटना आज दुपारी घाटकोपर परिसरात घडली. शाब्दिक वादातून हत्या झाल्याचे समोर आले आहे. हत्येनंतर हल्लेखोर हे पळून गेले आहेत. रात्री उशिरा पंत नगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत. मृत व्यक्ती ही कार डिलर होता. आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास विक्रोळी वाहतूक चौकी येथे एका वाहनातून दोन जण जात होते. तर मोटरसायकलवरून एक जण जात होता. तेव्हा वाहन चालवण्यावरून त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. मोटरसायकलवरून जाणाऱ्या व्यक्तीने वाहनातून जाणाऱ्या मालकावर हल्ला केला.