आनंददायी कला

>> सामना प्रतिनिधी

ज्यांना सुंदर रंगांत, चित्रांत विहार करायला आवडतो त्यांच्यासाठी ग्लासपेंटिंग हा करीयरचा रंगतदार पर्याय.

सौंदर्य, कलात्मकता, नावीन्य यामध्ये ज्यांना रमायला आवडतं. वेगवेगळ्या प्रकारची नक्षी अनोख्या पद्धतीने, कलाकुसर करून विविध रंगांनी साकारायला आवडते अशांसाठी ग्लास पेंटिंग हा करीयरचा एक आनंददायी मार्ग आहे. विविध आकार, प्रकारची काचेची भांडी, दिवे, पणत्या इत्यादींना घरात, कार्यालयात शोकेस किंवा होम डेकोर म्हणून तयार करण्याची संधी या करीयरमध्ये आहे.

फ्लोरल, बिडिंग आणि पेस्टल रंगात रंगवलेल्या या किमती वस्तूंची किंमतही बाजारात चांगली मिळते. स्वतः शिकल्यानंतर ही कला इतरांना शिकवता येते. त्यामुळे नोकरी सांभाळून किंवा पूर्णवेळही हा व्यवसाय करता येऊ शकतो. पाने, फुले, निसर्गसौंदर्य, वारली अशा वैविध्यपूर्ण नक्षीरूपातील कलाकृती काचेवर साकारलेली ही कला नेत्रसुख देणारी असली तरी मनालाही आकर्षित करणारी आहे.

संधी
– परदेशात ग्लास पेंटिंगपासून तयार केलेल्या वस्तूंना मोठी मागणी आहे.
– काचेपासून तयार केलेले पोट्रेट खूपच सुंदर दिसतात यासाठी ते हॉटेल, घर, कार्यालय, रुग्णालयातील भिंतींना सजवण्यासाठी वापरल्या जातात.
– होम इंटिरीयरसाठी ग्लास पेंटिंग सर्वात जास्त लोकप्रिय माध्यम आहे. दरवाजे, खिडकी, रूम डिव्हायडर या ठिकाणी याचा वापर होतो.

संस्था
– उन्नती स्कूल ऑफ आर्ट, सहकार भंडार आगर बझार, पोर्तुगीज चर्चजवळ, दादर
– प्राजक्ता नार्वेकर आर्ट ग्लासेस, भवन्स कॉलेज लेन, भारतीय विद्या भवनजवळ, चौपाटी, मुंबई, 7.

अभ्यासक्रम
ग्लास पेंटिंगचा कोर्स 15 दिवस ते 3 महिन्यांपर्यंत करता येतो. कोणत्याही शाखेतील विद्यार्थी या कलेचे प्रशिक्षण घेऊ शकतात. फक्त त्यांना या विषयाची आवड हवी.

आपली प्रतिक्रिया द्या