करिअर : समुद्र सफर

जहाजावर अनेक प्रकारची कामे करणार्‍या कुशल कारागिरांची आवश्यकता असते. समुद्रमार्गे होणार्‍या व्यापारी मालवाहतुकीशी संबंधित जहाजावरील करीयर करण्याकडे आज तरुणांचा ओढा वाढत आहे. मालवाहतुकीचं माध्यम असलेल्या जहाजावरील करीयरचा मार्ग हा साहसी आणि अनेक आव्हानांनी भरलेला आहे. या नोकरीत प्रवाशांना घेऊन जाणार्‍या बोटीचे व्यवस्थापनासह मालवाहू बोटींचाही समावेश आहे. शिवाय नेव्हिगेशन अधिकारी, रेडियो अधिकारी, मरिन इंजिनीयर आणि काही शिपिंग कंपन्याही सहा ते नऊ महिन्यांच्या कराराने नोकर्‍या देतात.

रोजगार संधी आणि सुविधा

  • नौकानयन विभागामध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर विविध शिपिंग कंपन्यांमध्ये नोकरी मिळते. या क्षेत्रात वेतनात कंपनीनुसार, शहरांनुसार, आयात-निर्यातीच्या गरजेनुसार तफावत असते.
  • सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांना जहाजावर जेवण विनामूल्य उपलब्ध असते. काही वरिष्ठ अधिकार्‍यांना त्यांच्या पत्नीला एखाद्या वेळी सोबत नेण्याची संधीही मिळते.
  • परदेशी कंपन्यांमध्ये नोकरी मिळाल्यावर त्यांच्या चलनानुसार वेतन मिळते. यामुळे वेतनमूल्य वाढते. तसेच नोकरीच्या ठिकाणी फारसा दैनंदिन खर्च नसल्यामुळे वेतन सुरक्षित राहते.
  • दरवर्षी चार महिन्यांची रजा मिळते. काही कंपन्यांमध्ये तीन महिन्यांच्या प्रवासानंतर कर्मचार्‍यांना एक महिना रजा देण्यात येते.

आवश्यक पात्रता

  • जहाजावरील करीयरसाठी बारावीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयात ६० टक्के तर इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण आवश्यक आहेत.)
  • जहाजावरील अभ्यासक्रमांना प्रवेश परीक्षांच्या माध्यमातून प्रवेश मिळतो. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर स्क्रिनिंग आणि मुख्य लेखी  परीक्षाही उत्तीर्ण करावी लागते.
  • विद्यार्थ्यांना नोकरीसाठी अर्ज करण्याआधी जहाज प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. हे प्रशिक्षण अल्प कालावधीसाठी असते. यामध्ये प्राथमिक सुरक्षा उपायांचेही प्रशिक्षण दिले जाते.
  • परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मुलाखत, वैद्यकीय चाचणी, दृष्टीची चाचणी पूर्ण करावी लागते.
  • विद्यार्थ्याला पोहण्याचे किमान ज्ञान असणे आवश्यक आहे. 

मरिन इंजिनीयरिंग अभ्यासक्रम

बी.टेक. (मरिन इंजिनीयरिंग), जनरल पर्पज रेटिंग. या अभ्यासक्रमांना आय.एम.यू.- सी.ई.टी.मार्फत प्रवेश दिला जातो.

आपली प्रतिक्रिया द्या