
उन्हाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडते. कडक उन्हामुळे आर्दता आणि नैसर्गिक तेलांच्या कमतरतेमुळे त्वचा निस्तेज होते.
उन्हाळ्यात शक्यतो सौम्य साबण अंघोळीसाठी वापरा. अंघोळीसाठी कोमट पाणी वापरा. आहारात काकडी, टरबूज, संत्री, मोसंबी इत्यादी फळांचा समावेश करा.
चेहऱयासाठी काकडी, कोरफड, संत्रीचे घटक असलेले शीट मास्क किंवा जेल मास्क वापरा. यामुळे उष्णतेमुळे आलेला कोरडेपणा कमी होण्यास मदत होते.






























































