युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा, या मागणीचे निवेदन महाविकास आघाडीच्यावतीने जिल्हा पोलीस उपधिक्षक अमोल भारती यांना देण्यात आले. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, गिरिष जाधव, दिलदारसिंग बीर, प्रमोद वारुळे आदि उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी दि. 13 मे रोजी शिवसेना युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांच्यावर दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा. मतदानाच्या दिवशी महायुतीचे उमेदवाराकडून काही मतदारांना बोटाला बोटाला शाई लावून पैसे देण्याचा प्रकार सुरु होता. तो महाविकास आघाडीच्यावतीने उधळून लावण्यात आला. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज सर्व तपासणी करुन याची सखोल चौकशी करण्यात यावी व खोटा दाखल गुन्हा मागे घेण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे म्हटले आहे.
यावेळी संभाजी कदम म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना वेगवेगळे आमिष देण्यात येत होते, काही ठिकाणी पैसे वाटण्याचेही प्रकार झाले. याबाबत महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांनी यास प्रतिबंद केला. त्यामुळे याचा राग मनात धरुन असे खोटे गुन्हे आमच्या पदाधिकार्यांवर दाखल केले आहेत. संपूर्ण घटनांचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी तपासून, सत्य समोर आणावे, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले