डॉक्टरांवर थुंकणाऱ्या ‘त्या’ 27 जणांविरुद्ध गुन्हा, कठोर कारवाई होणार

2010

दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या तबलिगीच्या कार्यक्रमातून परतलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे कोरोना संशयित झालेल्या 27 जणांवर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांवर थुंकणे आणि हॉस्पिटलच्या परिसरात परवानगी नसतानाही एकत्र नमाज पढणे या कारणास्तव त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिल्लीच्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमातून परतलेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ज्या ज्या लोकांच्या संपर्कात तबलिगी जमातचे कार्यकर्ते संपर्कात आले होते अशा सर्वांची तपासणी करण्यात येत आहे. त्यातील काहीजणांनी तपासणीसाठी विरोध केला काही भागात पोलिसांवर आणि डॉक्टरांवर दगड फेकण्यासारखे प्रकारही करण्यात आले. अशातच 04 एप्रिल रोजी फिरोजाबाद येथील जिल्हा रुग्णालयात काही लोकांना तपासणीसाठी आणण्यात आले होते. यावेळी 27 जणांनी तपासणी वेळी डॉक्टर्स आणि हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना विरोध केला. तसेच अंगावर थुंकण्यासारखे किळसवाणे प्रकारही केले. तसेच हॉस्पिटलच्या परिसरात कोणालाही एकत्र येऊन धार्मिक प्रार्थना करण्यास मनाई केली असताना या व्यक्तींनी एकत्र येऊन नमाज पठण केले होते. कोरोनाचा धोका लक्षात घेता एकत्र येऊन प्रार्थना करण्यास मनाई आहे त्यामुळे या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या