फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या 11 जणांवर गुन्हा

697

फेसबुकवर महापुरूष आणि देवतांबाबत आक्षेपार्ह मजकूर आणि फोटो पोस्ट करणाऱ्या तसेच लोकांच्या धार्मिक भावना दुखावून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या 11 जणांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिन्मय पाटील, सुन्नी कांबळे, अजय ननावरे, राजगुरू कदम, सुमीत रणदिवे, बाटग्याचा बाप, शक्यमुनी बुद्ध, प्रवीण बोरकर, विहान कदम, शांताराम मांडवकर, मक्या शेठ फेसबुकवर या युजर आयडीवरून आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्या होत्या. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस ठाण्यातील हवालदार दादाराम जाधव यांनी याबाबतची तक्रार दिली आहे. 20 एप्रिल ते1 मे या कालावधीत या आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्या होत्या. जनतेच्या धार्मिक भावना दुखावून समाजात तेढ निर्माण होईल, अशा पोस्ट व्हायरल केल्याने या 11 जणांवर माहिती – तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे याबाबत अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या