मुंबई ते कासराळ अनधिकृत प्रवास करुन आलेल्या 19 जणांवर गुन्हा दाखल

1719

उदगीर तालूक्यातील मौजे कासराळ येथे मुंबईहून अनधिकृतपणे प्रवास करुन आलेले नागरिक आणि त्यांना घेऊन येणाऱ्या वाहनचालक अशा 19 जणांविरुध्द वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी नितीन पंडीतराव बेंबडे यांनी तक्रार दाखल केली.

पोलीस उदगीर तालूक्यातील मौजे कासराळ येथे गस्त घालत असताना त्यांना मुंबईहून एक आयशर टेम्पो कासराळ येथे आला. लॉकडाऊनमुळे कामधंदा नसल्याने मुंबईहून आयशर टेम्पोने कासराळला आल्याची माहिती टेम्पोमधील नागरिकांनी दिली. त्यांच्याकडे प्रवासाचा परवाना किंवा कोणतीही परवानगी नव्हती. त्यामुळे टेम्पो चालकासह 19 जणांविरुध्द वाढवणा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या