मेनका गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल; गरोदर हत्तिणीच्या मृत्यूवर केलं होत ‘हे’ विधान

4592

केरळमध्ये एका गर्भवती हत्तिणीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या हत्तिणीच्या मृत्यूनंतर भारतीय जनता पक्षाच्या खासदार मेनका गांधी यांनीही विधान केलं होत. त्यांच्या ह्याच विधानावरून आता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केरळमधील मल्लपुरम येथे मेनका गांधी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आयपीसीच्या कलम 153 अन्वये मेनका यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हे कलम धर्म, जात, जन्मस्थान, निवासस्थान, भाषा इत्यादींच्या आधारे वेगवेगळ्या गटांमधील वैर वाढविण्याशी संबंधित आहे.

काय म्हणाल्या होत्या मेनका गांधी?

गर्भवती हत्तिणीच्या मृत्यूनंतर मेनका गांधी म्हणाल्या की, ‘ही हत्या आहे. मल्लपुरम अशा घटनांसाठी प्रसिद्ध आहे. हे देशातील सर्वात हिंसक राज्य आहे. येथे लोक रस्त्यावर विष फेकतात. ज्यामुळे एकाच वेळी 300 ते 400 पक्षी आणि कुत्री मारले जावे. केरळमध्ये दर तिसर्‍या दिवशी एका हत्तीला मारले जाते. केरळ सरकारने मल्लपुरम प्रकरणात अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. असे वाटते की ते घाबरले आहेत,’ असं त्या म्हणाल्या होत्या. त्यांच्या या विधानावर लोकांनी आक्षेप नोंदवला आहे. केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांनीही मेनका गांधी यांना हे विधान मागे घेण्यास सांगितले आहे. ते म्हणाले की, ‘हत्तिणीचा मृत्यू दुःखद आहे. या संपूर्ण प्रकरणात दोषींवर कारवाई झाली पाहिजे. मात्र केरळमधील मल्लपुरम जिल्ह्याविषयी मेनका गांधींचे विधान अस्वीकार्य आहे.’

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मल्लपुरम येथे एक हत्तीण भूक लागल्याने अन्नाच्या शोधात फिरत होती. यावेळी काही लोकांनी तिला फटाके भरलेले अननस खायला घातले. त्या मुक्या जनावराने अन्न मिळालं म्हणून आनंदात ते अननस खाल्ले. थोड्याच वेळात या हत्तिणीला त्रास व्हायला लागला. ती त्रास कमी व्हावा म्हणून नदीत जाऊन उभी राहिली, मात्र त्रास वाढत गेला आणि तिचा तिथेच मृत्यू झाला

आपली प्रतिक्रिया द्या