
ऑपरेशन सिंदूरची माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांना दहशतवाद्यांची बहीण म्हणणाऱ्या भाजप नेते आणि मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री कुंवर विजय शहा यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने यासंदर्भात शहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले व शहा यांना फटकारले. त्यानंतर रात्री उशिरा इंदूर पोलिसांनी शहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.