जबरदस्त फॉर्मात असलेल्या कॅथलिक जिमखाना फुटबॉल संघाने मुंबई फुटबॉल असोसिएशनच्या (एमएफए) सेकंड डिव्हिजन लीगचे जेतेपद पटकावले. त्यांनी सोमय्या एफसी 21 वर्षांखालील संघाचा 2-1 असा पराभव करताना लीगवर निर्विवाद वर्चस्व राखले.
कॅथलिक जिमखान्याचा हा विक्रमी सलग 14 वा विजय असून अपराजित राहून जेतेपद संपादण्याचा पराक्रम केला आहे. चॅम्पियन कॅथलिक जिमखान्याचा हा सुपर थ्री स्पर्धेतील हा दुसरा विजय आहे. सोमय्या एफसीपूर्वी त्यांनी रफियन्स एफसीचा 4-3 असा चुरशीच्या लढतीत पराभव केला होता. रफियन्सने सोमय्यावर 1-0 अशी मात करताना उपविजेतेपद मिळवले. मिडफिल्डर कर्ट डेमेलोने कॅथलिक जिमखान्याचे पूर्वार्धात गोल खाते उघडले. जोशुआ डिसोझाने मध्यंतरानंतर गोल करताना टीमला 2-0 असे आघाडीवर नेले.