आठवे आश्चर्य! … आणि कोब्राने चक्क ११ कांदे गिळले

20

सामना ऑनलाईन । भुवनेश्वर

कोब्रा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो काळ्याकुट्ट रंगाचा विषारी फुत्कार सोडणारा लांबलचक साप. पण ओडीशा येथे विष सोडणारा नाही तर चक्क कांदे गिळणारा कोब्रा आढळला आहे. तज्ज्ञांच्या मते कांदे गिळणारा हा जगातील एकमेव कोब्रा आहे. यामुळे या कोब्राला बघण्यासाठी चेंडीपाडा गावात गर्दी उसळली आहे.

अंगुल जिल्ह्यातील चेंडीपाडा गावात सुशांता बेहरा यांच्या घरी हा कोब्रा लपून बसला होता. कोब्राला घरातून हुसकवून लावण्यासाठी काढण्यासाठी सुशांता यांनी जवळच पडलेले कांदे त्याच्यावर फेकण्यास सुरूवात केली. ते बघून अजून काहीजणांनी कोब्राच्या दिशेने कांदे फेकले. ते बघताच कोब्रा चवताळला. तो घरातील भींतीच्या कपारीतून बाहेर आला. कोब्राला पाहताच अनेकांची दातखिळीच बसली व ते इकडे तिकडे धावू लागले. कोब्रा घराच्या मधोमध वेटोळे घालून कांदे सुंघू लागला. त्यानंतर त्याने एक एक करत चक्क ११ कांदे गिळले. हे बघून अनेकांनी मोबाईलमध्ये त्याचे चित्रण केले. त्यानंतर कोणीतरी सर्पमित्राला पाचारण केले.

पाहा व्हिडीओ –

दरम्यान, गोंधळलेल्या परिस्थितीत काहीच कळत नसल्याने साप फळ गिळतात. पण एखाद्या सापाने ११ कांदे गिळणे ही जगातील पहीलीच घटना असल्याचं सर्पतज्ज्ञ सचिव सुभेंदू मलिक यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या