सरकारविरोधात कोर्टात गेलेल्या माजी ‘सीबीआय’ प्रमुखाची देणी रखडवली

667

अयोग्य पद्धतीने पदावरून हटवल्यामुळे मोदी सरकारविरोधात कोर्टात जाणे माजी ‘सीबीआय’ प्रमुख आलोक वर्मा यांना चांगलेच महागात पडले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ते आपल्या निवृत्तीनंतर मिळणारी देणी मिळवण्यासाठी पायपीट करीत आहेत. सरकारविरोधात कोर्टात गेल्यामुळेच त्यांची देणी रखडवल्याचे बोलले जात आहे.

आलोक वर्मा हे 1979 च्या बॅचचे ‘आयपीएस’ अधिकारी आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांना मनमानीपणे सुट्टीवर गेल्याचे कारण देत गृहमंत्रालयाच्या पत्रानुसार पदावरून हटवण्यात आले. वर्मा हे 11 ते 31 जानेवारी या कालावधीत सुट्टीवर गेले होते. ही सुट्टी मनमानीपणे घेतली असल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले असून त्यांची सेवा ‘ब्रेक’ झाल्याचा निर्वाळाही दिला आहे. या पार्श्वभूमीवर वर्मा यांची देणी थकवली असल्याचे स्पष्ट होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या