अनिल अंबानींविरोधात आरोपपत्र दाखल, येस बँक घोटाळा

सुमारे अडीच हजार रुपयांच्या येस बँक घोटाळ्या प्रकणी प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी, येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर, त्यांची पत्नी बिंदू कपूर, त्यांच्या मुली राधा व रोशनीसह अन्य कंपन्यांविरोधात गुरुवारी सीबीआयने आरोपपत्र दाखल केले.

कर्ज मंजुरी व गुंतवणूक नियमांचे उल्लंघन करून हा घोटाळा झाल्याचा ठपका सीबीआयने आरोपपत्रात ठेवला आहे. हे आरोपपत्र विशेष सीबीआय न्यायालयाने स्वीकारले आहे. त्यामुळे आता आरोप निश्चितीसह खटल्याची पुढील प्रक्रिया लवकरच सुरू होईल. याने अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सीबीआयचा आरोप

क्रेडिट एजन्सीने सांगूनही अनिल अंबानी समूहाच्या कंपन्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली. याने येस बँकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 2022पासून सीबीआय याचा तपास करत आहे. राणा कपूर यांच्या मंजुरीनंतर आरसीएफएल कंपनीत तब्बल 2 हजार 45 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. आरएचएफएल कंपनीत 2 हजार 965 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली, असा आरोप आहे.

असा दिला होता इशारा

केअर रेटिंगमध्ये अनिल अंबानी समूहाच्या कंपन्यांची आर्थिक स्थिती ढासळत चालली असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. या कंपन्यांवर खास देखरेख ठेवण्यात आली होती. या कंपन्यांमध्ये गुंतवणूक न करण्याचा इशारा देण्यात आला होता. तरीही या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली.