
तामीळनाडूतील करूर चेंगराचेंगरीप्रकरणी टीव्हीके अभिनेता-नेता विजय थलापती यांना सीबीआयने 12 जानेवारी रोजी हजर राहण्यासाठी समन्स पाठवले आहे. ही चेंगराचेंगरी गेल्या वर्षी 27 सप्टेंबर रोजी करूर जिह्यातील विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कझगम’ पक्षाच्या रॅलीदरम्यान झाली होती. विजयच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत 41 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 60 हून अधिक लोक जखमी झाले होते.
या प्रकरणासंदर्भात सीबीआयने तमिळगा वेत्री कझगमच्या अनेक पदाधिकाऱयांची चौकशी केली आहे. सीबीआयने या प्रकरणात विजय यांना चौकशीसाठी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर ते आरोपपत्र दाखल करण्याचा विचार करू शकतात, असे समजते.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, सीबीआयने एसआयटीकडून हे प्रकरण आपल्या हातात घेतले आहे. विजयच्या रॅलीसाठी 10 हजार लोकांना परवानगी होती. प्रशासनाला 50 हजार लोक जमण्याचा अंदाज होता, पण तिथे सुमारे 1 लाख 20 हजार लोक एकत्र आले होते.






























































