
दरवर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीत होणाऱया सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा 4 मे ते 10 जून या कालावधीत होणार असल्याचे आज केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी जाहीर केले. 1 मार्चपासून विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल परीक्षांना सुरुवात होणार असून मुख्य परीक्षांचे निकाल 15 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहेत. मुख्य परीक्षा लेखी स्वरुपातच होईल, असे पोखरियाल यांनी जाहीर केले आहे.





















































