
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) वर्ष 2021 मधील दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींसाठी बोर्डाने मेरिट शिष्यवृत्ती योजना आणली आहे. पालकांचे एक मुलगी अपत्य असलेल्या विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. ही शिष्यवृत्ती मिळण्यासाठी विद्यार्थिनींना ऑनलाइन अर्ज करावा लागणार असून शिष्यवृत्तीसंबंधी पात्रतेचे निकष www.cbse.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 17 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.


























































