CBSE result, दहावीचा निकाल 91.46 %, पुणे विभाग चौथ्या क्रमांकावर

689
प्रातिनिधिक फोटो

बारावीच्या पाठोपाठ सीबीएसईच्या दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दहावीचा एकूण निकाल गेल्यावर्षी पेक्षा 0.36 टक्क्यांनी अधिक म्हणजे 91.46 टक्के लागला आहे. यंदा 18,73,015 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती, त्यापैकी 17,13,121 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

त्रिवेंद्रम विभाग पहिल्या क्रमांकावर असून चेन्नई, बंगळुरू पाठोपाठ पुणे विभागाचा चौथा क्रमांक लागला आहे. पुणे विभागाचा एकूण निकाल 98.05 टक्के इतका लागला आहे. पहिल्या क्रमांकावर असलेल्या त्रिवेंद्रमचा एकूण निकाल 99.28 टक्के इतका लागला आहे.

CBSE 10th result 2020

मुलांच्या तुलनेत मुलींनी दहावीच्या निकालात देखील आघाडी घेतली आहे. मुलांचा एकूण निकाल 90.14 टक्के असून मुलींचा एकूण निकाल 93.31 टक्के म्हणजे 3.17 टक्क्यांनी अधिक लागला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या