Video- वज्रेश्वरी मंदिरातील दरोड्याचा थरार सीसीटीव्हीत कैद

68

सामना ऑनलाईन । ठाणे

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वज्रेश्वरी मंदिरावर शुक्रवारी पहाटे सहा सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांनी मंदिरातील पाच दानपेट्या फोडून त्यातील बारा लाख रुपये लुटले. मंदिरातील दरोड्याचा थरार येथे लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील प्रसिद्ध वज्रेश्वरी मंदिरात शुक्रवारी पहाटे सरक्षारक्षकाचे हात-पाय बंधून सहा सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला. दरोडेखोर हातात शस्त्र घेऊन मंदिरात फिरताना आणि दानपेटीत पैसे गोण्यांमध्ये भरतानाचे दृष्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे. या मंदिरात यापूर्वीही दरोडा टाकण्यात आला होता. त्यामुळे वजेश्वरी देवी मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरोड्यामुळे भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या