शांतता हवी असेल तर युद्धाला तयार राहा, सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी सांगितली देशाची रणनीती

हिंदुस्थान नेहमीच शांततेचा समर्थक राहिला आहे. याचा अर्थ असा नाही की आपला देश शांततावादी आहे. शांतता कायम राखण्यासाठी ताकदीची गरज असते, असे नमूद करतानाच जर शांतता हवी असेल तर युद्धाला तयार राहा, अशा शब्दांत सीडीएस अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांनी हिंदुस्थानची युद्धाची पुढील रणनीती सांगितली. मध्य प्रदेशातील महू येथे आयोजित रण संवाद या कार्यक्रमात सीडीएस चौहान बोलत होते.

आर्यन डोमच्या धर्तीवर हवाई संरक्षण प्रणाली

इस्रायलची अत्याधुनिक बहुस्तरीय हवाई संरक्षण प्रणाली डोम आर्यन अतिशय मजबूत असे संरक्षण कवच आहे. क्षेपणास्त्रेही हे कवच भेदू शकत नाही. अशाच प्रकारचे कवच म्हणून हिंदुस्थानची सुदर्शनचक्र हवाई संरक्षण प्रणाली काम करेल. असे चौहान म्हणाले.

सुदर्शनचक्र ढाल आणि तलवारीसारखे

सुदर्शनचक्र हवाई संरक्षण प्रणाली हिंदुस्थानचे लष्करी तळ, संवेदनशील ठिकाणे, नागरी वस्त्यांच्या संरक्षणासाठी ढाल आणि तलवार म्हणून काम करेल. 2035पर्यंत सुदर्शनचक्र ही हवाई संरक्षण प्रणाली पूर्णपणे तयार असेल, असेही चौहान यांनी सांगितले.