सीमेवर घमासान, पाकड्यांच्या गोळीबारात दोन जवान शहीद

279

सीमेवर पाकड्यांच्या कुरापती सुरूच असून आज पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात हिंदुस्थानचे दोन जवान शहीद झाले तर एका नागरिकाचा मृत्यू झाला. पाकिस्तानी सैनिक वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहेत. या गोळीबारात गेल्या दहा महिन्यांत हिंदुस्थानच्या तब्बल 14 जवानांना वीरमरण पत्करावे लागले आहे. आजही पाकडय़ांनी असाच अंदाधुंद गोळीबार केला.

पाकिस्तानी लष्कराने तंगधार सेक्टरमध्ये अंदाधुंद गोळीबार सुरू केला. पाकिस्तानच्या गोळीबारात एक घर व एका तांदळाच्या गोदामाचे नुकसान झाले. एक गोठाही उद्ध्वस्त झाला असून त्यात 18 गाई होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या