कोरोना काळात केंद्र सरकारकडून आर्थिक मदत नाही, पश्चिम बंगाल सरकारचा दावा

modi-and-mamata

कोरोना संकटकाळात केंद्र सरकारकडून कुठलीच आर्थिक मदत मिळाली नाही असा दावा पश्चिम बंगाल सरकारने दिली आहे. राज्य सरकारने आतापर्यंत 4 हजार कोटी रुपये खर्च केल्याचेही सरकारने म्हटले आहे.

महिला व बालविकास मंत्री शशी पंजा म्हणाल्या की, राज्य सरकारनेच कोरोना संकटकाळात खर्च केला. केंद्राकडून कुठलीच मदत मिळाली नाही. राज्य सरकारने आतापर्यंत चार हजार कोटी रुपये खर्च केले. सरकारने जूनपर्यंत 1200 कोटी रुपये आणि त्यानंतर 2800 कोटी रुपये खर्च केले आहेत.

मंत्री पंजा म्हणाल्या की, अम्फान वादळामुळे राज्याचे एक लाख कोटीहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. वादळातून झालेल्या नुकसान आणि बचाव कार्यासाठी राज्याने आतापर्यंत 6 हजार 500 कोटी खर्च केल्याचे त्यांनी सांगितले.

तर दुसरीकडे केंद्र सरकारने काहीच आर्थिक मदत केली नसल्याचे पंजा यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारकडून 50 हजार कोटी येणे आहेत ते सुद्धा केंद्र सरकारने दिले नसल्याचे पंजा यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या