देशातील सर्वोत्तम शहरांची यादी जाहीर, वाचा कितव्या क्रमांकावर आहे तुमचं शहर

केंद्रीय शहर विकास मंत्रालयाने आज देशातील सर्वोत्तम शहरांची यादी जाहीर केली आहे. या शहरांच्या यादीत 10 लाखांच्या वर लोकसंख्या असलेल्या शहरात बंगळुरू पहिल्या स्थानावर आहे तर याच यादीत मुंबई ही दहाव्या स्थानावर आहे. मात्र यात महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगली बाजू अशी की या यादीत राज्यातील तीन मोठी शहरं आहेत.

केंद्रीय मंत्रालयाने गुरुवारी ईज ऑफ लिविंग इंडेक्स रैंकिंग-2020 ची यादी जाहीर केली आहे. यात 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत बंगळुरू पहिल्या स्थानावर, पुणे दुसऱ्या स्थानावर तर अहमदाबाद तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीत महाराष्ट्रातील पुणे, नवी मुंबई (सहाव्या स्थानावर), मुंबई (दहाव्या स्थानावर) आहेत.

तर दहा लाखाखालील लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील एकही शहर नाही. या यादीत शिमला पहिल्या, भुवनेश्वर दुसऱ्या व सिल्वासा हे तिसऱ्या स्थानावर आहेत.

असे झाले सर्वेक्षण

या सर्वेक्षणासाठी सरकारकडून 14 कॅटेगरी बनवल्या होत्या. त्यात शहराचा शैक्षणिक विकास, आरोग्य सोयी सुविधा, राहण्यासाठी कितपत योग्य आहे, आर्थिक विकासाचा स्तर, ट्रान्सपोर्ट, स्वच्छता, पर्यावरण, रोजगाराची संधी, हरित क्षेत्र, इमारती, प्रदुषण याबाबत सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात 32 लाख 20 हजार लोकांनी त्यांचे मत नोंदवले. या सर्वेक्षणात 111 शहरांनी सहभाग घेतला होता.

आपली प्रतिक्रिया द्या