
केंद्र सरकारने आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या अटी आणि शर्तींना औपचारिक मान्यता दिली आहे, अशी माहिती अर्थ मंत्रालयाने एका राजपत्र अधिसूचनेद्वारे दिली आहे. नव्या वर्षात 1 जानेवारी 2026 पासून नवीन वेतनश्रेणी लागू केल्या जाणार असून याचा फायदा 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांना मिळणार आहे. न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई या आयोगाच्या अध्यक्षा असणार आहेत. पंकज जैन यांची सदस्य-सचिव म्हणून तर प्राध्यापक पुलक घोष यांची अर्धवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयोग 18 महिन्यांच्या आत आपल्या शिफारसी सादर करणार आहे.



























































