प्रकल्पांसाठी 78 हजार हेक्टर वन जमिनीचा बळी   

देशाच्या फुफ्फुसावर मोदी सरकार हळूहळू आघात करत असून गेल्या चार वर्षांत विविध प्रकल्पांसाठी तब्बल 78 हजार 100 हेक्टर वनजमिनींचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती मोदी सरकारने राज्यसभेत दिली. इतक्या मोठय़ा प्रमाणावर जंगलांचा सरकारने बळी घेतल्याचे समोर आले आहे. केंद्रीय मंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी लेखी उत्तर दिले. दरम्यान महाराष्ट्रात 3 हजार हेक्टर वनजमीन विविध प्रकल्पांसाठी सरकारने गिळल्याचे उघड झाले आहे.