युजरनेमवरून टेलिग्राम, सिग्नललाही केंद्राची नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑनलाइन फसवणूक वाढल्याच्या घटनामुळे केंद्र सरकारने व्हॉट्सअॅपनंतर आता टेलिग्राम आणि सिग्नल या मेसेजिंग प्लॅटफॉर्मनाही नोटीस बजावली आहे.

माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या दोन्ही प्लॅटफॉर्मवरील युजरनेम फिचरबाबत स्पष्टीकरण मागवले आहे. या सुविधेमुळे होणाऱया संभाव्य गैरवापराला कसा आळा घातला जात आहे याची माहिती विचारण्यात आली आहे. केंद्र सरकारने टेलिग्रामला पाठवलेल्या नोटिशीत सरकारने युजर नेम फिचर कायम ठेवण्याची गरज काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याआधी बुधवारी केंद्र सरकारने मेटाला व्हॉट्सअॅपच्या प्रस्तावित युजरनेम फिचरबाबत नोटीस पाठवून सरकारचे समाधान होईपर्यंत ते स्थगित ठेवण्याचे निर्देश दिले होते.