
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसच्या रकमेत यंदा तिपटीने वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबत कर्मचारी संघटनांनी केलेली मागणी मान्य झाल्यास यंदाच्या दिवाळीत कर्मचाऱ्यांचा आनंद त्रिगुणित होईल. सध्या किमान 6 हजार 908 रुपये इतका बोनस मिळतो. ही रक्कम नव्या सूत्रानुसार 20 हजार 724 इतकी होऊ शकते.


























































